Avatar photo

ज्ञानेश्वर जाधव

ज्ञानेश्वर चंद्रकला गोरखनाथ जाधव यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधून पदवीचे (BE) शिक्षण पूर्ण केले असून, त्यांचे पदव्युत्तर पदवीचे शिक्षण (MA) राज्यशास्त्र आणि आंतराष्ट्रीय संबंध या विषयात झाले आहे. तसेच ते राज्यशास्त्र या विषयात नेट (NET) परीक्षा उत्तीर्ण होऊन सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी पात्र झाले आहेत. त्याच सोबत त्यांना विद्यापीठ अनुदान आयोगाकडून देण्यात येणारी 'ज्युनियर रिसर्च फेलोशिप (JRF)' प्राप्त आहे. ते यूपीएससी आणि एमपीएससी या स्पर्धा परीक्षांच्या परीक्षार्थींना मागील पाच वर्षांपासून मार्गदर्शन करत असून, त्यांनी स्वतः देखील मराठी माध्यमातून यूपीएससीच्या मुख्य परीक्षा दिल्या आहेत. यूपीएससी मार्फत घेण्यात येणाऱ्या CAPF (AC) परीक्षेत ते मुलाखतीसाठी पात्र झाले होते. तसेच ते सध्या, ‘महाराष्ट्रातील महिला मतदारांच्या वर्तनाचा अभ्यास विशेष संदर्भ - औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ (2014 ते 2024)’ या विषयावर पीएचडी करत आहेत.

राजकीय विचारप्रणालींची थोडक्यात ओळख

राजकीय विचारप्रणाली या जागतिक पातळीवर चर्चेच्या केंद्रस्थानी असतात. त्यांचा वापर आपल्या चर्चेत रूळला आहे. पण त्यांचा नेमका अर्थ काय आहे, त्या आपण ज्या प्रकारे वापरतो, ते खरंच विषयाला धरून आहे का? हे समजून घेण्यासाठी विचार प्रणालीचा थोडक्यात अर्थ खाली देण्यात आला आहे.

Read More

उजव्या आणि डाव्या राजकीय विचारातील फरक

आपल्या चर्चेत नेहमी डावी, उजवी आणि केंद्रीय विचारसरणी असे शब्द येत असतात, पण त्यात नेमके कोणत्या विचारसरणीला काय म्हणावे हे उमगत नाही. ते समजावे यासाठी हे बॅनर बनवले आहे, यातही काही गोष्टी लक्षात आल्या नसल्यास चिंता करू नका. येणार्‍या काळात आपण यावर विस्तृत चर्चा करणारच आहोत. अर्थात ती चर्चा राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध या विषयाच्या…

Read More

निवडणुकांच्या संदर्भातील काही कळीचे मुद्दे

भारतीय निवडणूक प्रक्रियेच्या संदर्भात अनेक मुद्दे चर्चेत असतात. या मुद्यांचा एकंदरीत निवडणूकीय प्रक्रियेवर आमूलाग्र परिणाम होतात. त्यामुळे त्यासंदर्भात चर्चा करणे अगत्याचे आहे. युपीएससीने देखील वेळोवेळी या संदर्भात पूर्व आणि मुख्य परीक्षेत प्रश्न विचारले असून, मुलाखतीच्या दृष्टीने देखील हे मुद्दे महत्त्वाचे आहेत. पेड न्यूज प्रेस कौन्सिलच्या अहवालानुसार प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये प्रसिद्ध झालेल्या कोणत्याही बातमीसाठी किंवा…

Read More

लोकप्रतिनिधित्व कायदे

लोकशाही शासन संरचनेत मुक्त आणि पारदर्शक निवडणूक प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची असते. जेणेकरून लोकांनी निवडून दिलेलेच सरकार सत्तेत येईल. याच अनुषंगाने भारतीय लोकशाहीला सक्षम करण्यासाठी निवडणुकीच्या संदर्भात कायदे करण्याचे स्पष्ट अधिकार भारतीय संविधानाने प्रदान केले आहेत. जसे की भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 82 अंतर्गत संसदेस मतदारसंघ पुनर्रचनेचा अधिकार देण्यात आला आहे. ज्यानुसार प्रत्येक जनगणनेनंतर केंद्र सरकार मतदारसंघ…

Read More