ज्ञानेश्वर चंद्रकला गोरखनाथ जाधव यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधून पदवीचे (BE) शिक्षण पूर्ण केले असून, त्यांचे पदव्युत्तर पदवीचे शिक्षण (MA) राज्यशास्त्र आणि आंतराष्ट्रीय संबंध या विषयात झाले आहे. तसेच ते राज्यशास्त्र या विषयात नेट (NET) परीक्षा उत्तीर्ण होऊन सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी पात्र झाले आहेत. त्याच सोबत त्यांना विद्यापीठ अनुदान आयोगाकडून देण्यात येणारी 'ज्युनियर रिसर्च फेलोशिप (JRF)' प्राप्त आहे. ते यूपीएससी आणि एमपीएससी या स्पर्धा परीक्षांच्या परीक्षार्थींना मागील पाच वर्षांपासून मार्गदर्शन करत असून, त्यांनी स्वतः देखील मराठी माध्यमातून यूपीएससीच्या मुख्य परीक्षा दिल्या आहेत. यूपीएससी मार्फत घेण्यात येणाऱ्या CAPF (AC) परीक्षेत ते मुलाखतीसाठी पात्र झाले होते. तसेच ते सध्या, ‘महाराष्ट्रातील महिला मतदारांच्या वर्तनाचा अभ्यास विशेष संदर्भ - औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ (2014 ते 2024)’ या विषयावर पीएचडी करत आहेत.
टीम UPSCinMarathi ही ज्ञानेश्वर जाधव सरांच्या मार्गदर्शनाखाली सामूहिकरीत्या हे लिखाण करते. या टीममध्ये स्वतः मराठी माध्यमातून नागरी सेवा मुख्य परीक्षा दिलेले अनुभवी परीक्षार्थी समाविष्ट आहेत. या व्यतिरिक्त जे लिखाण आपल्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, ते विशिष्ट लेखकांनी केलेले आहे.
कायदेशीर प्रक्रिया, न्यायालयीन खटले, सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाने वेळोवेळी दिलेल्या निर्णयांचे विश्लेषण करण्यात गजानन गायकवाड यांचे विशेष प्रावीण्य आहे.
आंतरराष्ट्रीय संबंध आणि समकालीन जागतिक घडामोडी या संदर्भात वेगवेगळ्या माध्यमात प्रथमेश पुरूड यांचे लिखाण आहे. सर्वसमावेशक विचार आणि तार्किक युक्तिवाद यांचे आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या विश्लेषणातील महत्त्व, यांच्या लिखाणातून अधोरेखित होते.