
सुशासन अर्थ आणि व्याप्ती
मागील लेखात आपण शासन व्यवहार आणि सरकार/शासन यातील फरक तसेच गव्हर्नन्स या संकल्पनेची विस्तृत चर्चा केली आहे. आज आपण गुड गव्हर्नन्स म्हणजेच सुशासन या संकल्पनेचा आढावा घेणार आहोत. या लेखात आपण सुशासन म्हणजे काय, सुशासनाची वैशिष्ट्ये काय आहेत, तसेच सुशासन प्रत्यक्षात आणताना येणारे अडथळे अभ्यासणार आहोत. सुशासन या संकल्पनेची तात्विक मांडणी आपल्याला कौटिल्याच्या अर्थशास्त्रात, प्लेटोच्या…