पेपर-१
- साधने :
पुरातत्वशास्त्रीय साधने : अन्वेषण, उत्खनन, पुरालेखविद्या, नाणकशास्रख, ऐतिहासिक स्मारके;
साहित्यिक साधने : देशीय, प्राथमिक आणि दुय्यम; काव्य, वैज्ञानिक साहित्य, प्रादेशिक भाषामधील साहित्य, धार्मिक साहित्य, परकीय वृत्तांत (account), ग्रीक, चीनी आणि अरब लेखक. - प्रागैतिहासिक काळ आणि आद्यैतिहासिक काळ भौगोलिक घटक; शिकार करणे आणि टोळ्यांनी राहणे (पुराश्मयुग आणि मध्याष्मयुग) शेती करण्यास सुरुवात (नवाश्मयुग आणि कांस्यपाषाण युग)
- सिंधू खोरे संस्कृती: उत्पत्ती, काळ, विस्तार, वैशिष्ट्ये, ऱ्हास, जीवन आणि महत्त्व, कला व वास्तुशास्त्र.
- बृहदाश्मयुगीन संस्कृतीः सिंधूसंस्कृतीखेरीज पशुपालन व कृषि संस्कृतीची विभागणी, सामूहिक जीवनाचा विकास, वसाहती, शेतोचा विकास, हस्तकला, मातीची भांडी आणि लोह उद्योग.
- आर्य व वैदिक कालखंड :
भारतातील आर्यांचा विस्तारः
वैदिक कालखंडः धार्मिक आणि तात्विक साहित्यः ऋग्वैदिक ते उत्तर वैदिक काळातील बदल, राजकीय, सामाजिक आणि आर्थिक जीवन; वैदिक युगाचे महत्त्व; राजेशाही आणि वर्ण व्यवस्थेची उत्क्रांती. - महाजनपदांचा कालखंड: राज्यांची निर्मिती (महाजनपद) गणराज्य आणि राजेशाही; नागरी केंद्राचा उदयः व्यापार मार्ग; आर्थिक वृध्दी; नाणेपध्दतीचा प्रारंभः जैन व बौद्ध धर्माचा प्रसार; मगध व नंद घराण्याचा उदय. इराणी आणि ग्रीक यांची आक्रमणे आणि त्यांचे परिणाम.
- मौर्य साम्राज्य : मौर्य साम्राज्याचा पाया चंद्रगुप्त, कौटिल्य व अर्थशास्त्र, अशोक, धर्माची संकल्पना, राजाज्ञा; राज्यव्यवस्था प्रशासन, अर्थव्यवस्थाः कला, वास्तुशास्त्र व शिल्पकलाः परराष्ट्र संबंधः धर्मः धर्माचा प्रचारः साहित्य, साम्राज्याचे विघटन; शुंग व कण्व.
- मौर्य-उत्तर कालखंड (इंडो- ग्रीक, शक, कुशाण, पश्चिम क्षत्रप): बाह्य जगाशी संपर्क; नागरी केंद्रांची वाढ, अर्थव्यवस्था, नाणेपध्दती धर्माचा विकास, महायान, सामाजिक परिस्थिती, कला, वास्तुशास्त्र, संस्कृती, साहित्य व विज्ञान.
- पूर्व भारत, दख्खन आणि दक्षिण भारतातील प्रारंभिक राजसत्ता आणि समाजः खारवेल, सातवाहन, संगम कालखंडातील तामिळ राज्य; प्रशासन, अर्थव्यवस्था, भूमी अनुदान, नाणे पध्दती, व्यापारी संघ व नागरी केंद्रे; बौद्ध केंद्र; संगम साहित्य आणि संस्कृतीः कला व वास्तुशास्र.
- गुप्त वाकाटक आणि वर्धन: राज्यव्यवस्था व प्रशासन, आर्थिक स्थिती, गुप्त कालखंडातील नाणे पध्दती, भूमी अनुदान, नागरी केंद्रांचा -हास, भारतीय सरंजामशाही, जाती व्यवस्था, महिलांची स्थिती, शिक्षण आणि शैक्षणिक संस्थाः नालंदा, विक्रमशिला आणि वल्लभी, साहित्य, वैज्ञानिक साहित्य, कला व वास्तुशास्त्र.
- गुप्त कालखंडातील प्रादेशिक राजसत्ताः कदंब, पल्लव, बदामीचे चालुक्य; राज्यव्यवस्था व प्रशासन, व्यापारी संघ, साहित्य; वैष्णव व शैव धर्माची वाढ. तमिळ भक्ती चळवळ, शंकराचार्य, वेदांत; मंदिर संस्था व मंदिर वास्तुकला, पाल, सेन, राष्ट्रकुट, परमारः राज्यव्यवस्था व प्रशासन, सांस्कृतिक पैलू, अरबांचा सिंधवरील विजयः अल्बेरुनी, कल्याणी चालुक्य, चोल, होयसूळ, पांड्यः राज्यव्यवस्था आणि प्रशासन; स्थानिक शासन; कला व वास्तुशास्त्राची वाढ, धार्मिक संप्रदाय, मंदिर संस्था व मठ, अग्रहार. शिक्षण व साहित्य अर्थव्यवस्था व समाज.
- प्रारंभिक भारतीय सांस्कृतिक इतिहासातील संकल्पनाः भाषा व संहिता, कला व वास्तुशास्राच्या उत्क्रांतीमधील प्रमुख टप्पे, प्रमुख तत्त्ववेत्ते आणि ज्ञानशाखा, विज्ञान व गणितातील कल्पना.
- प्रारंभिक मध्ययुगीन भारत, इ.स. ७५० १२०० :
- राज्यव्यवस्था : उत्तर भारत आणि द्वीपकल्पामधील प्रमुख राजकीय घडामोडी, राजपुतांचे कूळ (Origin) व उदय.
- चोलः प्रशासन, ग्रामीण अर्थव्यवस्था आणि समाज, ” भारतीय सरंजामशाही “.
- कृषि प्रधान अर्थव्यवस्था आणि नागरी वसाहती.
- व्यापार व वाणिज्य
- समाजः ब्राह्मणांची स्थिती आणि नवीन समाज व्यवस्था.
- स्त्रियांची स्थिती.
- भारतीय विज्ञान व तंत्रज्ञान,
- भारतातील सांस्कृतिक परंपरा, इ.स. ७५०-१२०० :
- तत्त्वज्ञानः शंकराचार्य आणि वेदांत, रामानुज व विशिष्ट द्वैत, मध्व आणि ब्राह्म- मीमांसा.
- धर्मः धर्माचे स्वरूप व वैशिष्ट्यें, तमिळ भक्ती पंथ, भक्ती पंथाची वाढ, इस्लाम आणि त्याचे भारतातील आगमन, सुफीवाद.
- साहित्य: संस्कृतमधील साहित्य, तमिळ साहित्याची वाढ, नव्याने विकसित होत असलेल्या भाषांतील साहित्य, कल्हनची राजतरंगिणी, अल्बेरुनीचा भारत.
- कला व वास्तुशास्त्र : मंदिर वास्तुकला, शिल्पकला, चित्रकला.
- तेरावे शतक :
- दिल्ली सुलतानशाहीची स्थापनाः म. घोरीची आक्रमणे म. घोरीच्या यशामागील घटक.
- आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक परिणाम.
- दिल्लीच्या सुलतानशाहीची स्थापना आणि प्रारंभिक तुर्की सुलतान
- दृढीकरण: इल्तुतमिश आणि बलबन यांची राजवट
- चौदावे शतक :
- “खिल्जी क्रांती”
- अल्लाउद्दीन खिल्जी: जिंकलेले प्रदेश आणि प्रादेशिक विस्तार, कृषि विषयक व आर्थिक उपाययोजना.
- मुहम्मद तुघलक: प्रमुख प्रकल्प, कृषि विषयक उपाययोजना, मुहम्मद तुघलक कालीन नोकरशाही.
- फिरोझ तुघलक : कृषिविषयक उपाययोजना, स्थापत्य अभियांत्रिकी आणि सार्वजनिक बांधकामामधील कामगिरी, सुलतानशाहीचा -हास, परराष्ट्रीय संबंध आणि इब्न बतूताचे वर्णन.
- चौदाव्या व पंधराव्या शतकातील समाज, संस्कृती आणि अर्थव्यवस्थाः
- समाज : ग्रामीण समाजाची रचना, सत्ताधिशांचे वर्ग, शहरी रहिवासी, महिला, धर्मातील वर्ग, सुलतानशाहीमधील जाती आणि गुलामी, भक्ती चळवळ, सुफी चळवळ.
- संस्कृती : पार्शियन साहित्य, उत्तर साहित्य भारताच्या प्रादेशिक भाषांतील साहित्य, दक्षिण भारताच्या भाषांमधील वाङमय, सुलतानशाहीमधील वास्तुशास्त्र आणि नवीन संरचनात्मक नमुने, संमिश्र संस्कृतीची उत्क्रांती.
- अर्थव्यवस्था : कृषि उत्पादन, नागरी अर्थव्यवस्थेचा उदय आणि अकृषि उत्पादन, व्यापार व वाणिज्य.
- पंधरावे शतक व सोळाव्या शतकाचा प्रारंभचा राजकीय विकास आणि अर्थव्यवस्था :
- प्रांतीय राजघराण्यांचा उदयः बंगाल, काश्मीर (सैन-उल-अबेदिन), गुजरात.
- माळवा, बहामनी राज्य
- विजयनगर साम्राज्य.
- लोदी.
- मुघल साम्राज्य, प्रारंभिक स्थिती; बाबर, हुमायुन.
- सूर साम्राज्यः शेरशाहाचे प्रशासन, पोर्तुगीजांचे वसाहत विषयक उपक्रमः भक्तो व सुफी चळवळी.
- पंधरावे शतक आणि सोळाव्या शतकाचा प्रारंभ समाज व संस्कृती :
- प्रादेशिक संस्कृतीची वैशिष्ट्ये
- साहित्यिक परंपरा
- प्रांतिक वास्तुशास्त्र
- विजयनगरच्या साम्राज्यातील समाज, संस्कृती, साहित्य आणि कला.
- अकबर :
- जिंकलेले प्रदेश आणि साम्राज्याचे दृढीकरण.
- जहागीर व मनसब पध्दतींची सुरुवात
- राजपूत विषयक धोरण
- धार्मिक व सामाजिक दृष्टीकोनाचा विकास, सुलह-ए-कुल सिद्धांत व धार्मिक धोरण.
- कला व तंत्रज्ञानाला राजाश्रय.
- सतराव्या शतकातील मुघल साम्राज्य :
- जहांगीर, शाहजान आणि औरंगजेब यांची प्रमुख प्रशासकीय धोरणे.
- साम्राज्य व जमीनदार
- जहांगीर, शाहजान आणि औरंगजेब यांची धार्मिक धोरणे.
- मुघल राज्याचे स्वरूप
- सतराव्या शतकाच्या उत्तरार्धातील अराजक आणि बंड.
- अहोम राज्य
- शिवाजी आणि प्रारंभिक मराठा राज्य
- १६ व्या आणि १७ व्या शतकातील अर्थव्यवस्था व समाजव्यवस्थाः
- लोकसंख्या, कृषि आणि हस्तकला उत्पादन.
- शहरे, डच, इंग्रज फ्रेंच कंपन्यांमार्फत युरोपबरोबर व्यापार: एक व्यापार क्रांती
- भारतीय व्यापारी वर्ग, बँकिंग, विमा आणि पतपेढ्या.
- शेतकऱ्यांची स्थिती, महिलांची स्थिती
- शीख समुदाय व खालसा पंथाचा उदय.
- मुघल कालीन संस्कृतीः
- पर्शियन इतिहास लेखन आणि इतर साहित्य.
- हिंदी व धार्मिक साहित्य.
- मुघल वास्तुशास्र
- मुघल चित्रकला
- प्रांतीय वास्तुशास्त्र आणि चित्रकला
- शास्त्रीय संगीत
- विज्ञान व तंत्रज्ञान
- अठरावे शतकः
- मुघल साम्राज्याच्या हासाचे घटक
- प्रादेशिक राज्येः निजाम, दख्खन, बंगाल, अवध.
- पेशव्यांच्या अधिपत्याखालील मराठ्यांची राज्य.
- मराठ्यांची आर्थिक व वित्तीय व्यवस्था अफगाण सत्तेचा उदय, पानिपतची लढाई १७६१.
- ब्रिटिशांच्या विजयाच्या पूर्वसंध्येला राजकीय, सांस्कृतिक आणि आर्थिक स्थिती.
पेपर-२
- भारतामध्ये यूरोपीयनांचे आगमनः
प्रारंभिक काळातील युरोपियन वसाहती; पोर्तुगीज आणि डच; इंग्रज व फ्रेंच ईस्ट इंडिया कंपन्याः वर्चस्वासाठी त्यांचे संघर्ष; कर्नाटक युध्दे, बंगाल इंग्रज आणि बंगालचे नवाब यांच्यातील संघर्ष, सिराज उद्दौल्ला व इंग्रज, प्लासीची लढाई: प्लासीचे महत्त्व. - भारतातील ब्रिटीशांचा विस्तारः
बंगाल-मीर जाफर व मीर कासिम; बक्सारची लढाई, म्हैसूर: मराठाः तीन इंग्रज – मराठा युध्दे; पंजाब. - ब्रिटीश राजवटीची प्रारंभिक रचनाः
प्रारंभिची प्रशासकीय रचनाः द्विदल राज्य पध्दतीकडून थेट नियंत्रणाकडे; रेग्यूलेटिंग कायदा (१७७३); द पिट्स अॅक्ट (१७८४), चार्टर अॅक्ट (१८३३); मुक्त व्यापाराचे स्वातंत्र्य (Voice) आणि ब्रिटीशांच्या वसाहत विषयक राजवटीचे बदलते स्वरूपः इंग्रजांचा उपयोगितावाद व भारत. - ब्रिटीश वसाहतवादी राजवटीचा अर्थव्यवस्थेवर प्रभाव :
ब्रिटीश भारतातील जमीन महसूल पध्दती; कायमधारा पध्दती; रयतवारी पध्दती; महालवारी पध्दती; महसुली व्यवस्थेचा अर्थव्यवस्थेवरील परिणामः कृषीचे व्यापारीकरण; भूमिहीन कृषी मजुरांचा उदयः ग्रामीण समाजाची निर्धनताः पारंपरिक व्यापार व वाणिज्य यामधील अव्यवस्थाः अनौद्योगिकरण पारंपरिक हस्तकलांचा ऱ्हास, संपत्तीचे निःसारण; भारताचे आर्थिक परिवर्तन; तार व टपाल सेवांसह रेल्वे-रस्ते मार्गाचे आणि दळणवळणाचे जाळेः ग्रामीण भागातील दुष्काळ व दारिद्र्यः युरोपीन व्यवसायिक उपक्रम आणि त्यांच्या मर्यादा. - सामाजिक व सांस्कृतिक विकास :
स्वदेशी शिक्षणाची स्थिती, आणि त्याची अव्यवस्था; पौर्वात्य-इंग्रजी अभ्यासकांमधील वादः भारतात पाश्चिमात्य शिक्षणाची सुरुवात; मुद्रणकलेचा (प्रेस) उदयः साहित्य व जनमत; आधुनिक देशी भाषांचा उदय; विज्ञानाची प्रगती; भारतातील खिश्चन मिशनऱ्यांच्या हालचाली. - बंगाल आणि इतर प्रांतातील सामाजिक व धार्मिक सुधारणा चळवळीः
राजाराम मोहन रॉय, ब्राह्मो समाज चळवळ, देवेंद्रनाथ टागोरः ईश्वरचंद्र विद्यासागरः यंग बंगाल चळवळः दयानंद सरस्वती; सती, विधवा पुनर्विवाह, बाल विवाह इत्यादीसह भारतातील सामाजिक सुधारणा चळवळी; आधुनिक भारताच्या वृद्धोसाठी भारतीय प्रबोधन युगाचे योगदान, इस्लामिक पुनरुज्जीवन वाद फेराझी व वहाबी चळवळी. - ब्रिटिश राजवटीला भारतीयांची प्रतिक्रिया:
रंगपूर धिंग (१७८३), कोल बंड (१८३२) मलबार मधील मोपला बंड (१८४१ – १९२०), संथाळ हुल (१८५५), निळीचे बंड (१८५९-६०) दख्खन उठाव (१८७५) आणि मुंडा उलगुलन (१८९९ – १९००) यांसह १८ व्या व १९ व्या शतकातील शेतकरी चळवळी व आदिवासी उठावः १८५७चा उठावः उगम, स्वरूप, अपयशाची कारणे, परिणामः १८५७ नंतरच्या कालावधीत शेतकरी उठावांच्या स्वरूपातील बदल; १९२० ते १९३० मधील शेतकरी चळवळी. - भारतीय राष्ट्रवादाचा उदय होण्यास कारणीभूत ठरलेले प्रमुख घटक : काँग्रेसपूर्व संघटनांचे राजकारण, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापनाः काँग्रेसच्या उदयाच्या संबंधातील सुरक्षा झडपेचा (सेफ्टी वॉल्व) सिद्धांत, काँग्रेसचे कार्यक्रम व उद्दिष्टेः सुरुवातीच्या काळातील कोंग्रेस नेतृत्वाची सामाजिक जडणघडण मवाळवादी आणि जहालवादी, बंगालची फाळणी (१९०५); बंगालमधील स्वदेशी चळवळ; स्वदेशी चळवळीचे आर्थिक आणि राजकीय पैलू: भारतातील क्रांतीकारी जहाल मतवादाची सुरुवात.
- महात्मा गांधीचा उदय:
गांधीवादी राष्ट्रवादाचे स्वरूपः गांधीजीची लोकप्रिय आवाहनेः रौलेट सत्याग्रह; खिलाफत चळवळ, असहकार चळवळ; असहकार चळवळीच्या अखेरीसपासून सविनय कायदेभंगाच्या चळवळीच्या प्रारंभापर्यंतचे राष्ट्रीय राजकारण, सविनय कायदेभंग चळवळीचे दोन टप्पे; सायमन आयोग; नेहरू अहवाल: गोलमेज परिषदा, राष्ट्रवाद आणि शेतकरी चळवळ राष्ट्रवाद आणि कामगार वर्गाच्या चळवळी, भारतीय राजकारणातील महिला आणि भारतीय तरुण व विद्यार्थी (१८८५-१९४७); १९३७ ची निवडणूक आणि मंत्रिमंडळांची निर्मिती क्रिप्स आयोग भारत छोडो चळवळ; वेव्हेल योजनाः कॅबिनेट आयोग. - १८५८ ते १९३५ मधील वसाहतिक भारतातील घटनात्मक विकास.
- राष्ट्रीय चळवळीतील इतर प्रवाह, क्रांतीकारी चळवळी: बंगाल, पंजाब, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मद्रास प्रांत, भारता बाहेरील क्रांतिकारी चळवळी / डावी विचारसरणी; काँग्रेसमधील डावी विचारसरणीः जवाहरलाल नेहरू, सुभाष चंद्र बोस, काँग्रेस समाजवादी पक्षः भारतीय साम्यवादी पक्ष, इतर डावे पक्ष.
- अलगाववादी राजकारणः मुस्लिम लिगः हिंदू महासभाः जातीयतावाद आणि फाळणीचे राजकारण, सत्तेचे हस्तांतरणः स्वातंत्र्य.
- राष्ट्रबांधणी: पं. नेहरुंचे परराष्ट्र धोरण: भारत आणि त्याचे शेजारी (१९४७-१९६४); राज्यांची भाषावार पुनर्रचना (१९३५ – १९४७); प्रादेशिकतावाद आणि प्रादेशिक असमानता; संस्थानांचे विलीनीकरण; निवडणूक राजकारणामध्ये संस्थानिकः राष्ट्रीय भाषेचा प्रश्न.
- १९४७ नंतरची जातीयता आणि वांशिकता; उत्तर-वसाहतवादी निवडणूक राजकारणातील मागास जाती आणि जमाती; दलित चळवळी.
- आर्थिक विकास आणि राजकीय बदल जमीन सुधारणा, नियोजनाचे राजकारण आणि ग्रामीण पुनर्रचना; उत्तर वसाहतवादी भारतातील परिस्थितिकी आणि पर्यावरण धोरण; विज्ञानाची प्रगती.
- प्रबोधन आणि आधुनिक कल्पनाः
(१) प्रबोधनाच्या मुख्य कल्पनाः कांट, रूसो.
(२) वसाहतींमधील प्रबोधनाचा प्रसार.
(३) समाजवादी विचारसरणीचा उदय (मार्क्सवादापर्यंत); मार्क्सवादी समाजवादाचा विस्तार प्रसार, - आधुनिक राजकारणाचा उगमः
(१) युरोपियन राज्यपद्धती
(२) अमेरिकन राज्यक्रांती आणि संविधान
(३) फ्रेंच राज्यक्रांती आणि नंतरचा काळ, (१७८९-१८१५)
(४) अब्राहम लिंकन यांच्या संदर्भात अमेरिकन गृहयुध्द आणि गुलामगिरीचे उच्चाटन ब्रिटिश लोकशाहीवादी राजकारण. १८१५-१८५०: संसदीय सुधारणा, मुक्त व्यापार, धर्मादाय संस्था. - औद्योगिकीकरण
(१) इंग्लंडची औद्योगिक क्रांती: कारणे आणि तिचा समाजावरील प्रभाव.
(२) इतर देशांमधील औद्योगिकीकरणः अमेरिका, जर्मनी, रशिया, जपान.
(३) औद्योगिकीकरण आणि जागतिकीकरण. - राष्ट्र- राज्य व्यवस्थाः
(१) १९ व्या शतकातील राष्ट्रवादाचा उदय.
(२) राष्ट्रवादः जर्मनी आणि इटलीमधील राष्ट्रउभारणी. जगभरातील राष्ट्रीयत्वाच्या उदयाच्या पार्श्वभूमीवर जगभरातील साम्राज्यांचे विघटन. - साम्राज्यवाद आणि वसाहतवाद
(१) दक्षिण आणि दक्षिण – पूर्व आशिया
(२) लॅटिन अमेरिका आणि दक्षिण अफ्रिका
(३) ऑस्ट्रेलिया
(४) साम्राज्यवाद आणि मुक्त व्यापारः नवसाम्राज्यवादाचा उदय. - क्रांती आणि प्रति राज्यक्रांती
(१) 19 व्या शतकातील युरोपियन राज्यक्रांत्या (१८३० व १८४८)
(२) रशियन राज्यक्रांती (१९१७-१९२१)
(३) फॅसिस्ट प्रतिक्रांती, इटली आणि जर्मनी
(४) चीनची राज्यक्रांती १९४९. - जागतिक महायुद्धेः
(१) पहिले व दुसरे जागतिक महायुध्द सामाजिक परिणाम.
(२) पहिले महायुद्ध : कारणे व परिणाम
(३) दुसरे महायुद्ध: कारणे व परिणाम. - दुसऱ्या जागतिक महायुद्धानंतरचे जगः
(१) दोन महासत्तांचा उदय
(२) तिसऱ्या जगाचा उदय आणि असंलग्नतावादाचा उदय.
(३) संयुक्त राष्ट्र संघटना आणि जागतिक विवाद. - वसाहती राजवटीपासून मुक्तीः
(१) लॅटीन अमेरिका- सायमन बोलिव्हर
(२) अरब जगत इजिप्त
(३) अफ्रिका वर्णभेद ते लोकशाही
(४) दक्षिण-पूर्व आशिया – व्हिएतनाम - निर्वसाहतीकरण आणि अविकसित राष्ट्रः
विकासात अडथळा निर्माण करणारे घटकः लॅटिन अमेरिका, अफ्रीका. - युरोपचे एकीकरण
(१) युध्दानंतरच्या संघटना, नाटो आणि युरोपियन समुदाय.
(२) युरोपियन समुदायाचे एकीकरण आणि विस्तार.
(३) युरोपियन संघ. - सोव्हिएत संघाचे विघटन आणि एकध्रुवीय जगाचा उदय :
(१) सोव्हिएत साम्यवाद आणि सोव्हिएत संघाचे विघटन होण्यातील प्रमुख घटक (१८८५ – १९९१).
(२) पूर्व युरोपमधील राजकीय बदल (१९८९ २००१)
(३) शीत युद्धाचा शेवट आणि एकमेव महासत्ता म्हणून जगावर अमेरिकेचा उदय,