पेपर-एक
समाजशास्त्राची मूलभूत तत्वे
- समाजशास्त्र-एक ज्ञान शाखा
(अ) युरोपातील आधुनिकता आणि सामाजिक परिवर्तन व समाजशास्त्राचा उदय.
(ब) विषयाची व्याप्ती व इतर सामाजिक शास्त्रांशी तुलना.
(क) समाजशास्त्र आणि सामान्य व्यवहार ज्ञान. - समाजशास्त्र- एक विज्ञानः
(अ) शास्त्र, शास्त्रीय पद्धत व मीमांसा.
(ब) संशोधन पद्धतीशास्त्रातील मुख्य सैद्धांतिक प्रवाह.
(क) प्रत्यक्षार्थवाद आणि त्याची मीमांसा.
(ड) तथ्ये, मूल्ये व वस्तुनिष्ठता.
(ई) प्रत्यक्षार्थवादा व्यतिरिक्तची पद्धतीशास्त्रे. - संशोधन पद्धती आणि विश्लेषणः
(अ) गुणात्मक व संख्यात्मक पद्धती.
(ब) तथ्य संकलनाची तंत्रे.
(क) चल, नमुनापद्धत, गृहीतकृत्य, विश्वसनीयता आणि वैधता. - समाजशास्त्रीय विचारवंतः
(अ) कार्ल मार्क्स – ऐतिहासिक भौतिकवाद, उत्पादनाच्या पद्धती, परात्मीकरण, वर्गसंघर्ष.
(ब) एमिल दुरखिम -श्रम विभाजन, सामाजिक तथ्य, आत्महत्या, धर्म व समाज.
(क) मॅक्स वेबर – सामाजिक क्रिया, आदर्श प्रकार, अधिकार, नोकरशाही, प्रोटेस्टंट नितीतत्वे आणि भांडवलशाहीचा आत्मा.
(ड) टॅल्कोल्ट पार्सन्स – सामाजिक व्यवस्था, प्रतिरुप चल घटक.
(इ) रॉबर्ट के. मर्टन- अप्रकट व प्रकट कार्य, अनुचलन व विचलन, संदर्भ समूह.
(फ) मीड – स्व आणि अस्मिता. - स्तरीकरण आणि गतिशीलताः
(अ) संकल्पना- समानता, असमानता, श्रेणीरचना, वर्जितता, दारिद्य व वंचितता.
(ब) सामाजिक स्तरीकरणाचे सिद्धांत- संरचनात्मक प्रकार्यवादी, मार्क्सवादी सिद्धांत, वेबरचा सिद्धांत
(क) आयाम-वर्गाची सामाजिक स्तरीभवन, दर्जात्मक समूह, लिंगभाव, वांशिकता आणि वंश (वांशिकता)
(ड) सामाजिक गतिशीलता-मुक्त आणि बंदिस्त प्रणाली, गतिशीलतेचे प्रकार, गतिशीलतेचे स्रोत व कारणे. - कार्य आणि आर्थिक जीवनः
(अ) विविध प्रकारच्या समाजातील कार्यांचे सामाजिक संघटन- गुलामगिरीचा समाज, सरंजामशाही समाज, औद्योगिक भांडवलशाही समाज.
(ब) कार्याचे औपचारिक व अनौपचारिक संघटन.
(क) श्रम आणि समाज. - राजकारण व समाज
(अ) सत्तेचे समाजशास्त्रीय सिद्धांत.
(ब) सत्ताधारी अभिजन, नोकरशाही, दबावगट व राजकीय पक्ष.
(क) राष्ट्र, राज्य, नागरिकत्व, लोकशाही, नागरी समाज, विचार प्रणाली.
(ड) निषेध, आंदोलन, सामाजिक चळवळी, सामूहिक कृती, क्रांती. - धर्म व समाज
(अ) धर्माचे समाजशास्त्रीय सिद्धांत.
(ब) धार्मिक प्रथांचे प्रकारः आत्मवाद, एकतत्ववाद, बहुतत्ववाद, संप्रदाय, पंथ, उपासना पद्धती.
(क) आधुनिक समाजातील धर्मः धर्म आणि विज्ञान, धर्मनिरपेक्षता, धार्मिक पुनरुज्जीवनवाद, मूलतत्त्ववाद. - नातेसंबंधाच्या पद्धती
(अ) कुटुंब, घरदार, विवाह
(ब) कुटुंबाचे प्रकार आणि स्वरूप.
(क) वंशावळ व वंशपरंपरा.
(ड) पितृसत्ताक पद्धती आणि लिंगाधारित श्रमविभागणी.
(इ) समकालीन कल. १० - आधुनिक समाजातील सामाजिक बदलः
(अ) सामाजिक परिवर्तनाचे समाजशास्त्रीय सिद्धांत.
(ब) विकास आणि परावलंबन.
(क) सामाजिक परिवर्तनाचे कर्ते.
(ड) शिक्षण आणि सामाजिक परिवर्तन.
(इ) विज्ञान, तंत्रज्ञान आणि सामाजिक परिवर्तन.
पेपर-दोन
भारतीय समाजः संरचना आणि परिवर्तन
अ. भारतीय समाजाची ओळखः
- भारतीय समाजाच्या अध्ययनाचे परिप्रेक्ष्य.
(अ) प्राच्यविद्याशास्त्र (जी.एस.घुर्ये)
(ब) संरचनात्मक प्रकार्यवाद (एम.एन. श्रीनिवास)
(क) मार्क्सवादी समाजशास्त्र (ए. आर. देसाई) - वसाहतवादी राजवटीचा भारतीय समाजावरील परिणाम :
(अ) भारतीय राष्ट्रवादाची सामाजिक पार्श्वभूमी
(ब) भारतीय परंपरेचे आधुनिकीकरण
(क) वसाहतवादी कालखंडादरम्यानचा विद्रोह व चळवळी
(ड) सामाजिक सुधारणा
ब. सामाजिक संरचना
- ग्रामीण व कृषक सामाजिक संरचनाः
(अ) भारतीय खेड्यांची कल्पना व खेड्यांचा अभ्यास
(ब) कृषक समाज संरचना- भू-धारणा पद्धतीची उत्क्रांति, जमिन सुधारणा. - जाती व्यवस्था
(क) जाती व्यवस्था अभ्यासाचे परिप्रेक्ष्यः जी.एस. घुर्ये, एम.एन. श्रीनिवास, लुई द्युमाँ, आन्द्रे बेत्ती.
(ब) जाती व्यवस्थेची वैशिष्ट्ये.
(क) अस्पृश्यता-स्वरूप व परिप्रेक्ष्य. - भारतातील आदिवासी समुदाय
(अ) परिभाषीय समस्या
(ब) भौगोलिक विस्तार
(क) वसाहतवादी धोरणे व जमाती
(ड) एकात्मतेचे आणि स्वायत्ततेचे प्रश्न - भारतातील सामाजिक वर्ग
(अ) कृषक वर्गीय संरचना
(ब) औद्योगिक वर्ग संरचना
(क) भारतातील मध्यमवर्ग - भारतातील नातेसंबंधी पध्दती
(अ) भारतीय वंशावळ व वंशपरंपरा
(ब) नातेसंबंधाचे प्रकार
(क) भारतीय कुटुंब व विवाह पद्धती
(ड) कुटुंबाचा घरदारविषयक पैलू
(इ) पितृसत्ताक पद्धती, हक्क व लिंगाधारित श्रमविभागणी - धर्म व समाज
(अ) भारतातील धार्मिक समुदाय
(ब) धार्मिक अल्पसंख्याक समुदायांच्या समस्या
क. भारतातील सामाजिक परिवर्तनः
- भारतातील सामाजिक परिवर्तनाची दृष्टीः
(अ) विकासासाठीच्या नियोजनाची कल्पना व मिश्र अर्थव्यवस्था
(ब) संविधान, कायदा व समाज परिवर्तन
(क) शिक्षण आणि समाजपरिवर्तन - भारतातील ग्रामीण व कृषक स्थित्यंतरः
(अ) ग्रामविकास कार्यक्रम, समुदाय विकास कार्यक्रम, सहकारी संस्था, दारिद्रय निर्मूलन योजना.
(ब) हरितक्रांती आणि सामाजिक परिवर्तन
(क) भारतीय कृषीक्षेत्रातील उत्पादनाच्या बदलत्या पद्धती
(ड) ग्रामीण श्रमिकवर्ग, गुलामी, स्थलांतर. - भारतातील औद्योगीकीकरण व नागरीकरण
(अ) भारतातील आधुनिक उद्योगाची उत्क्रांती
(ब) भारतात नागरी वसाहतींची वाढ
(क) कामगार वर्गः संरचना, वाढ, वर्गीय गतिशीलता
(ड) अनौपचारिक क्षेत्र, बाल कामगार
(इ) शहरी क्षेत्रातील झोपडपट्टया व त्यांची वंचितता. - राजकारण व समाजः
(अ) राष्ट्र, लोकशाही आणि नागरिकत्व
(ब) राजकीय पक्ष, दबाव गट, सामाजिक व राजकीय अभिजन
(क) प्रादेशिकतावाद व सत्तेचे विकेंद्रीकरण
(ड) निधर्मीकरण - आधुनिक भारतातील सामाजिक चळवळीः
(अ) कृषक चळवळी व शेतकरी आंदोलन
(ब) स्त्रियांच्या चळवळी
(क) मागासवर्ग व दलित चळवळी
(ड) पर्यावरणीय चळवळी
(इ) वांशिकता व अस्मितेवर आधारलेल्या चळवळी - लोकसंख्या गतितत्वः
(अ) लोकसंख्या आकारमान, वाढ, रचना व वितरण
(ब) लोकसंख्या वाढीचे घटकः जन्म, मृत्यू, स्थलांतर
(क) लोकसंख्या धोरण व कुटुंब नियोजन
(ड) अलिकडे उद्भवलेले प्रश्नः वृद्धत्व, लिंगदर, बालमृत्यूदर व शिशूमृत्यूदर, प्रजोत्पादक आरोग्य. - सामाजिक स्थित्यंतराच्या समस्या :
(अ) विकासाचे अरिष्टः विस्थापन, पर्यावरणीय प्रश्न व शाश्वतता.
(ब) दारिद्य, वंचितावस्था व विषमता
(क) महिलांवर हिंसाचार
(ड) जातीय संघर्ष
(इ) वांशिक संघर्ष, धर्माधारित संघर्ष, धार्मिक पुनरुज्जीवनवाद
(फ) निरक्षरता व विषमता