मानवशास्त्र (मराठी व इंग्रजी माध्यम)
पेपर – एक (विषय सांकेतांक १०१३)
१) १.१. मानवशास्त्राचा अर्थ, व्याप्ती आणि विकास
१.२ इतर ज्ञानशाखांशी संबंध: सामाजिक शाखे, वर्तन विषयक शास्त्रे, जैवशास्त्रे, वैद्यकीय शास्त्रे, भूशास्त्रे आणि मानव्य विज्ञान
१.३ इतर ज्ञानशाखांशी मानवशास्त्राच्या मुख्य शाखा, त्यांची व्याप्ती व समर्पकता
(अ) सामाजिक-सांस्कृतिक मानवशास्त्र
(ब) जैविक मानवशाख
(क) पुरातत्वीय मानवशास्त्र
(ड) भाषिक मानवशास्त्र
१.४ मानवी उत्क्रांती व मानवाचा उदय
(अ) मानवी उत्क्रांतीमधील जैविक आणि सांस्कृतिक घटक
(ब) जैविक उत्क्रांतीचे सिध्दांत (डार्विन पूर्व, डार्विन, डार्विनोत्तर)
(क) उत्क्रांतीचा संश्लेषणात्मक सिध्दांत, उत्क्रांतीवादी जीवशास्त्राच्या संज्ञा व संकल्पनाची संक्षिप्त रुपरेषा (डोलोचा नियम, कोप चा नियम, गॉसचा नियम, समातंरता, अभिसरण, अनुकूल उत्सर्जन आणि संकीर्ण उत्क्रांती).
१.५ नरवानर गण वर्गी प्राण्यांची वैशिष्टये, उत्क्रांतविषयक प्रवाह आणि नरवानर गण वर्गी प्राणी वर्गीकरण, नरवानर गण वर्गी प्राणी अनुकूलने, (वृक्षवासी व जमिनीवर राहणारे) वानरवर्गी प्राण्यांचे वर्गीकरण, वर्तन नरवानर गण वर्गी प्राण्यांचे तृतीयक व चतुर्थक काळातील जीवाश्म्; जिवंत असलेले मोठे नरवानर गण वर्गी प्राणी, मानवाचे आणि कपिंचे तौलनिक शरीररचनाशास्त्र, उभ्या स्थितीमुळे झालेले सांगड्यातील बदल आणि त्याचे परिणाम.
१.६ पुढील बाबींची जाति आनुवंशिकता स्थिती, वैशिष्ट्ये व भौगोलिक वितरण
(अ) दक्षिण व पूर्व आफ्रिकेतील प्लायो-प्लीस्टोसीन होमिनीड ऑस्ट्रेलोपिथेसिन
(ब) होमो इरेक्टस् : आफ्रिका (पॅरान्थ्रोपस), युरोप होमो इरेक्टस् (हायडेलबर्गेन्सिस), आशिया होमो
इरेक्टस जावानिकस, होमो इरेक्टस पेकिनेन्सिस)
(क) नीअँडरथाल मानव- ला शापेल ओ से (अभिजात प्रकार) माऊंट कारमेल (प्रागतिक प्रकार)
(ड) होडेशियन मानव
(इ) होमो सेपियन्स – क्रोमॅग्नॉन, ग्रीमाल्डी व शान्सीलाड
१.७ जीवनाचे जैविक मूलाधारः पेशी, डीएनए संरचना व प्रतिरुपीकरण, प्रथिने संश्लेषण, जनुक, उत्परिवर्तन, गुणसूत्रे, आणि पेशी विभाजन.
१.८ (अ) प्रागैतिहासिक पुरातत्वशास्त्राची तत्वे
कालगणनाः तौलनिक व निरपेक्ष कालगणना पध्दती.
(ब) सांस्कृतिक उत्क्रांती- प्रागैतिहासिक संस्कृतीची विस्तृत रूपरेषाः
(1) पुरापाषाणयुग
(2) मध्यपाषाणयुग
(3) नवअश्मयुग
(4) कांस्यपाषाणयुग
(5) ताम्रयुग
(6) लोहयुग
२) २.१ संस्कृतीचे स्वरूप : संस्कृती व नागरतेची संकल्पना व वैशिष्ट्ये, सांस्कृतिक सापेक्षतावाद लक्षात घेऊन स्वसंस्कृतिकेंद्रितता
२.२ समाजाचे स्वरूपः समाजाची संकल्पनाः समाज आणि संस्कृतीः सामाजिक संस्थाः सामाजिक गटः आणि सामाजिक स्तरीकरण.
२.३ विवाहः व्याख्या व सार्वत्रिकता, विवाहाचे सामाजिक-सांस्कृतिक नियम, (अंतर्विवाह, बहिर्विवाह, अनुलोम विवाह, प्रतिलोम विवाह, निषिध्द समागम निषेध); विवाहाचे प्रकार (एक पतीपत्नीत्व) बहुपतीपत्नीत्व, बहुपतित्व, गट विवाह) विवाहाची कार्ये, विवाहाच्या चालिरीती (अधिमान्य, नियत आणि प्रतिषिद्ध), विवाह प्रदाने (वधूमूल्य व हुंडा)
२.४ कुटुंब: व्याख्या व सार्वत्रिकता, कुटुंब, परिवार व पारिवारिक गट, कुटुंबाची कार्ये, कुटुंबाचे प्रकार (संरचना, रक्ताचे नाते, विवाह, निवास व उत्तराधिकार यांच्या दृष्टिकोनातून), शहरीकरण, औद्योगिकीकरण आणि स्त्रीवादी चळवळी यांचा कुटुंबावरील परिणाम.
२.५ नातेसंबंधः रक्तसंबंध आणि आप्तभाव, वंशपरंपरेची तत्वे व प्रकार (एकपक्षीय, दुहेरी, द्विपक्षीय उभयपक्षी), वंशपरंपरा गटांचे स्वरूप (वंशावळ, कूळ, भ्रातृक, समाज गट व नातेवाईक), नातेसंबधवाचक संज्ञा (वर्णनात्मक आणि वर्गीकरणानुसार) वंशपरंपरा, पितृत्व निश्चिती आणि मानार्थ पितृत्व निश्चिती, वंशपरंपरा आणि सख्यसंबंध.
३) आर्थिक संघटनाः आर्थिक मानवशास्त्राचा अर्थ, व्याप्ती व अन्वयार्थ, रूपवादी व वास्तववादी वादविवाद, समुदायातील उत्पादन, वितरण व विनियम (देवाणघेवाण, पुनर्वितरण व बाजार), शिकार व संग्रहण, मासेमारी, स्थलांतरित शेती, पशुपालन, बागकाम, आणि शेती यांवर असणारे उदरनिर्वाह यांच्या नियमनाची तत्वे, जागतिकीकरण आणि देशी आर्थिक पध्दती.
४) राजकीय संघटना आणि सामाजिक नियंत्रणः टोळी, आदिवासी समाज, अधिपतिराज्य, साम्राज्य व राज्यः सत्ता, अधिकार व अधिमान्यता यांची संकल्पना; साध्या समाजातील सामाजिक नियंत्रण, कायदा व न्याय.
५) धर्मः धर्माच्या अभ्यासाचा मानवशास्त्रीय दृष्टिकोन (उत्क्रांतिवादीं, मानसशास्त्रीय व कार्यप्राधान्यवादी); एकेश्वरवाद आणि अनेकदेवतावाद, पवित्र व धर्मनिंदक, पुराणकथा आणि विधी; आदिवासी व कृषकवर्गीय समाजातील धर्माची रूपे (जडप्राणवाद, जडप्राणमयतावाद, क्षुद्रवस्तुपूजा, निसर्गवाद आणि देवकवाद) धर्म, जादू व विज्ञान यातील फरक, जादू धार्मिक कार्याधिकारी (धर्मगुरू, देवऋषी, वैद्/भगत, चेटक्या आणि चेटकीण)
६) मानवशास्त्रीय सिध्दांतः
(अ) अभिजात उत्क्रांतिवाद (टेलर, मोर्गन व फ्रेझर)
(ब) ऐतिहासिक विशिष्टतावाद (बोआस) प्रसारवाद, ब्रिटिश जर्मन व अमेरिकन
(क) कार्यप्राधान्यवाद (मॅलिनोवस्की), संरचनात्मक कार्यवाद रॅडक्लिफ ब्राऊन)
(ड) संरचनावाद (लेव्ही स्ट्रॉस आणि ई. लीच)
(इ) संस्कृती आणि व्यक्तिमत्व (बेनेडीक्ट, मीड, लिंटन, कार्डीनर व कोरा-धू-बोआ)
(फ) नव-उत्क्रांतिवाद (चाईल्ड, व्हाईट, स्टिवार्ड, सॅहलिन्स् व सर्व्हिस)
(च) सांस्कृतिक भौतिकवाद (हॅरिस)
(छ) प्रतिकात्मक व अन्वयार्थक सिध्दांत (टर्नर, श्नायडर व गीर्टझ)
(ज) बोधात्मक सिध्दांत (टेलर, काँक्लीन)
(झ) मानवशास्त्रातील उत्तर आधुनिकतावाद.
७) संस्कृती, भाषा व संभाषण: भाषेचे स्वरूप, उगम व वैशिष्ट्ये, शाब्दिक व अ-शाब्दिक संभाषण, भाषा वापराचे सामाजिक संदर्भ.
८) मानवशास्त्रातील संशोधन पध्दतीः
(अ) मानवशास्त्रातील क्षेत्रिय कार्य परंपरा
(ब) तंत्र, पध्दती व पध्दतिमीमांसा यांमधील भेद
(क) माहिती संकलनाची साधनेः निरीक्षण, मुलाखत, अनुसूची, प्रश्नावली, प्रकरणी अभ्यास, वंशवृक्ष पध्दती जीवन-इतिहास, तोंडी इतिहास, माहितीचे दुय्यम स्रोत, सहभागी पध्दती.
(ड) माहितीचे विश्लेषण, अर्थउकल आणि सादरीकरण
९) ९.१ मानवी अनुवंशशास्त्रः पध्दती आणि उपयोजनः मानवी आनुवंशिक तत्वांच्या अभ्यासाच्या पध्दती – कुटुंब अभ्यास (वंशावळ विश्लेषण, जुळयांचे अभ्यास, पाल्य बालक, सह-युग्म पध्दती, पेशीअनुवंशिकी पध्दती, गुणसूत्री व गुणसूत्ररचना विश्लेषण) जैव रासायनिक पध्दती, प्रतिक्षमताशास्त्रीय पध्दती, डी.एन.ए. तंत्रज्ञान व पुनः संयोजी तंत्रज्ञाने.
९.२ मानवातील मेंडेलीय अनुवंशशास्त्र कुटुंब अभ्यास, मानवातील एकल घटक, बहुघटक, घातक, अल्पघातक आणि बहुजनक आनुवंशिकता.
९.३ अनुवंशिक बहुरूपता व निवड याची संकल्पना, मेंडेलीयन लोकसमूह, हार्डी वाइनबर्ग सिध्दांत; वारंवारीतेत बदल व खाली येण्याची कारणे उत्परिवर्तन, विविक्तीकरण, स्थानांतरण, निवड, अंतःप्रजनन आणि जीनी अपवहन. रक्तसंबंधी व रक्तसंबंधी नसणारा समागम, जीन भार, रक्तसंबंधी आणि दूर भावंड विवाहाचे आनुवंशिक परिणाम.
९.४ मानवातील गुणसूत्रे व गुणसूत्री विकृती, पध्दतीशास्त्र
(अ) संख्यात्मक आणि संरचनात्मक विकृती, विकार.
(ब) लिंग गुणसूत्री विकृती क्लाईनफेल्टर (एक्सएक्सवाय), टर्नर (एक्स ओ) विशेष महिला (एक्सएक्सएक्स), मध्यलिंगी आणि इतर संलक्षणी विकार.
(क) अलिंग गुणसूत्री विकृती संलक्षण-डाऊनचे संलक्षण पॅटाऊ, एडवर्ड आणि क्री- दू-शा संलक्षण.
(ड) मानवी आजारातील आनुवंशिक ठसे, आनुवंशिक परिक्षण, आनुवंशिक समुपदेशन, मानवी डीएनए पाश्र्वरेखन, जीन प्रतिचित्रण व जीनसंच अभ्यास.
९.५ वंश व वंशवाद, बिगर-मापीय रूपकीय विभेदांचा व वैशिष्ट्यांचा जैविक आधार, आनुवंशिकता व परिस्थिती या संबंधात वांशिक निकष, वांशिक गुणविशेष, वांशिक वर्गीकरणाचे जैविक आधार, मानवातील वांशिक विभेद आणि वंश संकर.
९.६ जीनी सूचक म्हणून वय, लिंग व लोकसंख्या विभेदः एबीओ, आरएच रक्तगट, एचएलए एचपी ट्रान्सफेरीन, जीएम, रक्त विकरे. शरीरक्रियात्मक वैशिष्ट्ये हिमोग्लोबिन पातळी, शरीर मेद, स्पंदन दर, श्वसन कार्य आणि वेगवेगळ्या सांस्कृतिक व सामाजिक आर्थिक गटांमधील ऐंद्रिय बोधन.
९.७ पर्यावरणीय मानवशास्त्राची संकल्पना व पद्धतीः जैविक सांस्कृतिक अनुकूलन आनुवंशिक व बिगर आनुवंशिक घटक. मानवाचा पर्यावरणात्मक तणावाला शरीरक्रियाशास्त्रीय प्रतिसाद: उष्ण वाळवंट, थंडी, समुद्रसपाटीपासून उच्च उंचीचे हवामान.
९.८ साथरोगशास्त्रीय मानवशास्त्र: आरोग्य आणि आजार, संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य आजार, पोषणविषयक कमतरतेशी संबंधित आजार.
१०) मानवी वाढ व विकास यांच्या संकल्पनाः वाढीच्या अवस्था जन्मपूर्व, जन्म, अर्भक, शैशव पौगंडावस्था, प्रौढता, वृध्दावस्थाः- वाढ व विकासावर परिणाम करणारे घटक आनुवंशिक परिस्थितीकीय, जैवरासायनिक, आहार, सांस्कृतिक व सामाजिक, आर्थिक, वय होणे व वृद्धावस्थाः सिद्धांत आणि निरीक्षणे- जैविक व कालक्रमानुसारी आर्युमान. मानवी शरीरयष्टी व देह प्रारूप वाढीचे अभ्यासाच्या अभ्यास पद्धती.
११) ११.१ जननक्षमतेमध्ये रजोदर्शनारंभ, रजोनिवृत्ती आणि इतर जैविक घटनांचे महत्व, प्रजननशक्ती आकृतीबंध व विभेदक.
११.२ जनसांख्यिकीय सिध्दांत-जैविक, सामाजिक व सांस्कृतिक.
११.३ गर्भधारण क्षमता, प्रजननक्षमता, जननप्रमाण आणि मृत्यूप्रमाण यावर प्रभाव टाकणारे जीवशास्त्रीय व सामाजिक परिस्थितीकीय घटक.
१२) मानवशास्त्राचे उपयोजनः क्रीडा मानवशास्त्र, आहार विषयक मानवशास्त्र, संरक्षण व इतर साधन सामग्रीच्या संकल्पनेतील मानवशास्त्र, न्यायसहाय्य मानवशास्त्र, वैयक्तिक अभिनिर्धारण व पुनर्रचनेच्या अभ्यास पद्धती व तत्वेः उपयोजित मानवी आनुवंशशास्त्र पितृत्व निदान, आनुवंशशास्त्र विषयक समुपदेशन आणि सुप्रजननशास्त्र, आजार व वैद्यकशास्त्र यामधील डीएनए तंत्रज्ञान, प्रजोत्पादक जीवशास्त्रातील सरोगसी सरोजेनेटिक्स व पेशी आनुवंशिकी.
पेपर-दोन (विषय सांकेतांक १०१४)
१) १.१ भारतीय संस्कृती व नागरतेची उत्क्रांती – प्रागैतिहासिक (पुराश्मयुगी, मध्यपाषाण युग, नवअश्मयुग आणि नवअश्मयुग – कांस्यपाषाणयुग) आद्य ऐतिहासिक युग (सिंधू नागरता) हडप्पापूर्व, हडप्पा आणि हडप्पोत्तर संस्कृती. आदिवासी संस्कृतीचे भारतीय नागरतेला योगदान.
१.२ शिवालिक व नर्मदा खोऱ्याच्या (रामापिथेकस, शिवापिथेकस आणि नर्मदा मानव) विशेष संदर्भासह भारतातील पुरामानवशास्त्रीय पुरावे.
१.३ भारतातील पुरातत्वीय मानवजातिवर्णन पुरातत्व शास्त्रः पुरातत्वीय मानवजातिवर्णन संकल्पनाः कला व हस्तकला उत्पादक समुदायांसह शिकार, चराई, मासेमारी, गुरे चारणारे आणि शेतकरी समुदायांमधील उत्तर जीवित्व आणि समांतरता.
२) भारताचे जनसांख्यिकीय चित्र- भारतीय लोकसंख्येतील मानवजातिय आणि भाषिक मूलतत्त्वे आणि त्यांचे वितरण भारतीय लोकसंख्या- तिच्या संरचनेवर आणि वाढीवर परिणाम करणारे घटक.
३) ३.१ पारंपारिक भारतीय समाजप्रणालीची रचना व स्वरूप- वर्णाश्रम, पुरुषार्थ, कर्म, ऋण व पुनर्जन्म.
३.२ भारतातील जात पद्धती- वर्ण व जातीची रचना आणि वैशिष्ट्ये, जात पद्धतीच्या उद्भावाचे सिद्धांत, प्रमुख जाती, जाती गतिशीलता, जात पद्धतीचे भविष्य, जजमानी पद्धती जनजाती- जाती सातत्य.
३.३ पवित्र समुच्चय आणि निसर्ग- माणूस- परमात्मा समुच्चय.
३.४ भारतीय समाजाच्या बौद्धवाद, जैनवाद, इस्लाम व ख्रिश्चनवाद यांचा प्रभाव.
४) भारतातील उदय, वाढ आणि विकास १८ व्या, १९ व्या आणि २० व्या शतकाच्या सुरुवातीच्या विद्वान- प्रशासकांचे योगदान. आदिवासी व जात अभ्यासातील भारतीय मानवशास्त्रज्ञांचे योगदान.
५) ५.१ भारतीय खेडे भारतातील खेड्यांच्या अभ्यासाचे महत्त्वः एक सामाजिक प्रणाली म्हणून भारतीय खेडे, वसाहतीचे पारंपारिक व बदलते आकृतीबंध आणि आंतरजातीय संबंध, भारतीय खेड्यांतील कृषी भूमी विषयक संबंध, भारतीय खेड्यांवरील जागतिकीकरणाचा प्रभाव.
५.२ भाषिक व धार्मिक अल्पसंख्यांक आणि त्यांचा सामाजिक, राजकीय व आर्थिक दर्जा.
५.३ भारतीय समाजातील सामाजिक-सांस्कृतिक बदलांची देशीय आणि बाहेरील प्रक्रियाः संस्कृतीकरण पश्चिमात्यीकरण आधुनिकीकरण, लहान व मोठ्या परंपरांचा आंतर प्रभाव, पंचायती राज आणि सामाजिक बदल, माध्यमे व सामाजिक बदल.
६) ६.१ भारतातील आदिवासींची स्थिती आदिवासी लोकसंख्येचे जीवजनन वैविध्य, भाषिक व सामाजिक- आर्थिक वैशिष्ट्ये आणि त्यांचे वितरण.
६.२ आदिवासी समुदायाच्या समस्या जमीन अन्यसंक्रमण, गरीबी, कर्जबाजारीपणा, कमी साक्षरता, कमी शैक्षणिक सुविधा, बेरोजगारी, अर्धरोजगारी, आरोग्य व पोषण आहार.
६.३ विकासात्मक प्रकल्प आणि त्यांचा आदिवासी विस्थापनेवरील परिणाम आणि पुनर्वसनाच्या समस्या. वन धोरणाचा विकास व आदिवासी. शहरीकरण व औद्योगिकरणाचा आदिवासी लोकसंख्येवरील प्रभाव.
७) ७.१ अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्ग यांच्या शोषणाच्या व वंचिततेच्या समस्या. अनुसूचित जमाती व अनुसूचित जातींकरिता घटनात्मक संरक्षणात्मक उपाययोजना.
७.२ सामाजिक बदल आणि समकालीन आदिवासी समाज, आधुनिक लोकशाही संस्था, विकास कार्यक्रम आणि कल्याणकारी उपाययोजना यांचा आदिवासींवर आणि दुर्बल घटकांवरील परिणाम.
७.३ वांशिकतेची संकल्पना, वांशिक संघर्ष व राजकीय विकास, आदिवासी समुदायांतील असंतोष, प्रादेशिकवाद व स्वायत्ततेची मागणी; खोटा-आदिवासीवाद. वसाहत काळ आणि भारताच्या स्वातंत्र्योत्तर काळातील आदिवासींमध्ये सामाजिक बदल.
८) ८.१ हिंदू, बौद्ध, ख्रिश्चन, इस्लाम आणि इतर धर्मांचा आदिवासी समाजावरील प्रभाव.
८.२ आदिवासी आणि राष्ट्र राज्य- भारतातील आणि इतर राष्ट्रातील आदिवासी समुदायांचा तौलनिक अभ्यास.
९) ९.१ आदिवासी क्षेत्रांचा प्रशासकीय इतिहास, आदिवासी विकासाची धोरणे, योजना, कार्यक्रम आणि त्यांची अंमलबजावणी. आदिम प्राचीन आदिवासी गटांची संकल्पना, त्यांचे वितरण, त्यांच्या विकासासाठीचे विशेष कार्यक्रम. आदिवासींच्या विकासामध्ये बिगर शासकीय संघटनांचे योगदान.
९.२ आदिवासी विकासामध्ये व ग्रामीण विकासामध्ये मानवशास्त्राची भूमिका.
९.३ प्रादेशिकतावाद, सांप्रदायिकता आणि वांशिकता व राजकीय चळवळींच्या आकलनासाठी मानववंशशास्त्राचे योगदान.