-: परीक्षा योजना:-
पेपर क्रमांक | गुण | कालावधी | मानक | माध्यम | पेपरचे स्वरूप |
पेपर – १ (अनिवार्य) | २०० | २ तास | पदवी | मराठी व इंग्रजी | वस्तुनिष्ट/ बहुपर्यायी |
पेपर – १ (अनिवार्य) | २०० | २ तास | घटक क्रमांक (१) ते (५) पदवी स्तर घटक क्रमांक (१) ते (५) पदवी स्तर घटक क्रमांक (१) ते (५) पदवी स्तर |
टीप – सामान्य अध्ययन पेपर क्रमांक २ (CSAT) हा अर्हताकारी (Qualifying) असून अर्हताप्राप्त करण्यासाठी किमान ३३% गुण मिळविणे आवश्यक राहील. या पेपरमध्ये किमान ३३% गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवारांची पेपर क्रमांक १ मधील गुणांच्या आधारे राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल.
नकारात्मक गुणदानः- पेपर क्रमांक १ करीता व पेपर क्रमांक २ मधील “Decision making and Problem Solving” चे प्रश्न वगळून उर्वरित प्रश्नांकरिता नकारात्मक गुणदान लागू राहील.
१) प्रत्येक चुकीच्या उत्तराकरीता २५% किंवा १/४ एवढे गुण एकूण गुणांमधून वजा/ कमी करण्यात येतील. |
२) एखाद्या प्रश्नाची एकापेक्षा अधिक उत्तरे दिली असल्यास अथवा ज्या उमेदवाराने उत्तरपत्रिकेत पूर्ण वर्तृळ चिन्हांकित केले नसेल अशा प्रश्नाचे उत्तर चुकीचे समजण्यात येऊन त्या प्रश्नाच्या उत्तराकरीता २५० किंवा १/४ एवढे गुण एकूण गुणांमधून वजा कमी करण्यात येतील. |
३) वरीलप्रमाणे कार्यपध्दतीचा अवलंब करताना एकूण अंतिम गुणांची बेरीज अपूणांकात आली तरीही ती अपूर्णांकातच राहील व पुढील कार्यवाही त्याच्या आधारे करण्यात येईल. |
४) एखाद्या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरित असेल तर, अशा प्रकरणी नकारात्मक गुणांची पध्दत लागू असणार नाही. |
अभ्यासक्रम
पेपर – एक (२०० गुण) | |
(१) | राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या चालू घडामोडी. |
(२) | भारताचा इतिहास व भारतीय राष्ट्रीय चळवळ. महाराष्ट्राच्या भाराशासह |
(३) | महाराष्ट्र, भारत व जगाचा भूगोल- महाराष्ट्राचा, भारताचा व जगाचा प्राकृतिक, सामाजिक, आर्थिक भूगोल |
(४) | भारत आणि महाराष्ट्र राज्यशास्त्र व प्रशासन सार्वजनिक धारण, हक्क विषयक प्रश्न इत्यादी. संविधान, राजकीय प्रणाली, पंचायती राज, नगर प्रशासन |
(५) | आर्थिक व सामाजिक विकास-शाश्वत विकास, दारिद्रय, समावेशन, लोकशाही, सामाजिक क्षेत्रातील उपक्रम इत्यादी |
(६) | पर्यावरण पारिस्थितीकी, जैव विविधता आणि हवामान बदल यांवरील सर्वसाधारण प्रश्न- याला विषय विशेषज्ञांची गरज नाही |
(७) | सामान्य विज्ञान |
पेपर – दोन (२०० गुण) | |
(१) | आकलन |
(२) | संवाद कौशल्यांसह आंतर व्यक्तिगत कौशल्य |
(३) | तर्कशुद्ध तके आणि विश्लेषणात्मक क्षमता |
(४) | निर्णय क्षमता आणि समस्या निराकरण |
(५) | सर्वसाधारण मानसिक क्षमता |
(६) | मूळ संख्याता (अंक आणि त्यांचे संबंध, परिमानाचा क्रम इत्यादी) (इयत्ता दहावी स्तरावरील), विदा, अनुयोजन (तक्ता, आलेख, कोष्टक, विदा पर्याप्तता इत्यादी- इयत्ता दहावी स्तरावरील) |
(७) | मराठी आणि इंग्रजी भाषा आकलन कौशल्य (इयत्ता दहावी / बारावी स्तरावरील) |
टीप- १ : इयत्ता दहावी/ बारावी स्तरावरील मराठी आणि इंग्रजी भाषा आकलन कौशल्याची तपासणी (पेपर २ च्या अभयासक्रमातील शेवटचा भाग) प्रश्नपत्रिकेत उलट भाषांतर न देता, मराठी आणि इंग्रजी भाषेतील परिच्छेदामार्फत करण्यात येईल.
टीप- २ : प्रश्न बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रकारचे असतील.
टीप- ३ : मूल्यमापनाच्या प्रयोजनासाठी राज्यसेवा (पूर्व) परीक्षेच्या दोन्ही पेपरला उमेदवारांनी बसणे अनिवार्य आहे. राज्यसेवा (पूर्व) परीक्षेच्या दोन्ही पेपरला तो/ती बसला नाही तर अशा उमेदवाराचा मूल्यमापनासाठी विचार करण्यात येणार नाही.