पेपर – एक
१) भाग – अ
भाषा आणि लोकसाहित्य
(अ) भाषेचे स्वरूप आणि कार्य (मराठीच्या संदर्भासह)
भाषा-एक संकेतप्रणालीः भाषा आणि भाषणः पायाभूत कार्य; काव्यात्मक भाषा; प्रमाण भाषा आणि बोली: सामाजिक परिमाणानुसार भाषिक वैविध्ये. तेराव्या शतकातील आणि सतराव्या शतकातील मराठीची भाषिक वैशिष्ट्ये.
(ब) मराठीच्या बोली – अहिराणी; वऱ्हाडी; डांगी.
(क) मराठी व्याकरण – शब्दांच्या जाती; विभक्ती विचार, प्रयोगविचार.
(ड) लोकसाहित्याचे स्वरूप आणि प्रकार (मराठीच्या विशेष संदर्भासह) लोकगीत, लोककथा, लोकनाट्य
२) भाग ब
साहित्य आणि साहित्यसमीक्षेचा इतिहास
(अ) मराठी साहित्याचा इतिहास
(१) इ. स. १८१८ च्या प्रारंभापासून खालील मुद्दांच्या विशेष संदर्भासहः महानुभाव लेखक, वारकरी कवी, पंडीत कवी, शाहीर, बखर साहित्य.
(२) सन १८५० ते १९९०, खालील प्रमुख वाङमय प्रकारांच्या वाटचालीच्या विशेष संदर्भात; काव्य, कथात्म साहित्य (कादंबरी आणि लघुकथा), नाट्य; आणि मुख्य साहित्यिक प्रवाह आणि चळवळी, स्वच्छंदतावादी, वास्तववादी, आधुनिकतावादी, दलित, ग्रामीण, स्त्रीवादी.
(ब) साहित्य समीक्षा
१. साहित्याचे स्वरूप व कार्य;
२. साहित्याचे मूल्यांकन;
३. साहित्य समीक्षेचे स्वरूप, उद्दिष्टे आणि पद्धतीः
४. साहित्य, संस्कृती आणि समाज,
पेपर – दोन
(उत्तरे मराठीतच लिहावीत)
नेमलेल्या साहित्यकृतींचा संहितालक्ष्यी अभ्यास
या अभ्यासपत्रिकेकरीता नेमलेल्या साहित्यकृतीचे प्रत्यक्ष वाचन आवश्यक आहे. उमेदवारांच्या साहित्यिक क्षमतांचे मूल्यमापन यात अपेक्षित आहे.
१) भाग अ
(गद्य)
(१) ‘स्मृतिस्थळ’
(२) महात्मा ज्योतीबा फुले – ‘शेतकऱ्याचा असूड’ ‘सार्वजनिक सत्यधर्म’
(३) श्री. व्यं. केतकर – ‘ब्राह्मणकन्या’
(४) प्र. के. अत्रे – ‘साष्टांग नमस्कार’
(५) शरच्चंद्र मुक्तिबोध – ‘जन हे वोळतु जेथे’
(६) उद्धव शेळके – शिळान
(७) बाबुराव बागुल – ‘जेव्हा मी जात चोरली होती’
(८) गौरी देशपांडे – ‘एकेक पान गळावया’
(९) प्र. ई. सोनकांबळे – ‘आठवणींचे पक्षी’
२) भाग ब
(काव्य)
(१) ‘नामदेवांची अभंगवाणी’ – संपा इनामदार, रेळेकर, मिरजकर, मॉडर्न बुक डेपो, पुणे
(२)’ पैंजण’ – संपाः म. ना. अदवंत, साहित्य प्रसार केंद्र, नागपूर
(३) ‘दमयंती स्वयंवर’ – रघुनाथ पंडीत
(४) ‘बालकवींची कविता’ – बालकवी
(५) ‘विशाखा’ – कसुमाग्रज
(६) ‘मृद्रगंध’ – विं. दा. करंदीकर
(७) ‘जाहीरनामा’ – नारायण सुर्वे
(८) ‘संध्याकाळच्या कविता’ – ग्रेस
(९) ‘या सत्तेत जीव रमत नाही’ – नामदेव ढसाळ