पेपर-एक
भूगोल विषयाची तत्वे
प्राकृतिक भूगोलः
- भूरुपशास्त्र: भूरुप विकासावर नियंत्रण ठेवणारे घटक; अंतर्जात आणि बहिर्जात बले; पृथ्वीच्या कवचाची उत्पत्ति आणि उत्क्रांती; भू-चुंबकत्वाची मूलभूत तत्वेः पृथ्वीच्या अंतरंगातील प्राकृतिक स्थिती; भूअभिनती; भूखंड वहनः समस्थायित्व भूपट्ट विवर्तनिकीः पर्वत निर्माणावरील अलीकडची मतेः ज्वालामुखी क्रिया, भूकंप आणि त्सुनामी; भूरुपिक चक्र आणि भुदृश्य विकासाची संकल्पना; अनाच्छादन कालानुक्रम; प्रवाह (चॅनल) रुपिकी; अपक्षरण पृष्ठभाग उतार विकास; उपयोजित भूरुपशाखः भूरुपशाख आर्थिक भूशाख आणि पर्यावरण.
- हवामानशास्त्रः तापमान आणि जागतिक दाब पड़े; पृथ्वीचा औष्णिक ताळेबंद; वातावरणीय अभिसरण; वातावरणीय स्थिरता आणि अस्थिरता ग्रहीय आणि स्थानिक वारे मान्सून आणि जेट प्रवाह वायूराशी आणि आघाडी / सोमा (from-to) समशीतोष्ण आणि उष्णकटिबंधीय चक्रीवादळे; वृष्टीचे प्रकार आणि वितरण; हवा आणि हवामान: कोपेन, थार्नध्वेट आणि त्रिवार्था यांचे जागतिक हवामानविषयक वर्गीकरण; जलचक्र; जागतिक हवामानातील बदल आणि हवामानातील बदला संबंधात मानवाची भूमिका आणि प्रतिसादः उपयोजित हवामानशाख आणि नागरी हवामान.
- सागरविज्ञानः अटलांटिक, हिंदी आणि पॅसिफिक महासागरांची तळरचना; महासागरांचे तापमान आणि क्षारताः उष्णता आणि क्षार ताळेबंद (budgets) सागरीय निक्षेप; लाटा, प्रवाह आणि भरती-ओहोटी; सागरी साधनसंपत्ती; जैव, खनिज आणि उर्जा साधनसंपत्ती; प्रवाळ, प्रवाळ विरंजन; सागर पातळीतील बदल ; सागरी कायदे आणि सागरी प्रदूषण
- जीवभूगोलशास्त्रः मृदांची उत्पत्ती: मृदांचे वर्गीकरण आणि वितरणः मृदाछेद, मृदेची धूप, हास व संधारण वनस्पती आणि प्राण्यांच्या जागतिक वितरणावर परिणाम करणारे घटक निर्वणीकरण समस्या आणि संधारणाचे उपायः सामाजिक वनीकरण; कृषि वनीकरण; वन्य जीवन; प्रमुख जीन संचय केंद्रे.
- पर्यावरण भूगोलः परिस्थितिकी तत्वे; मानवी पारिस्थितिकीय अनुकूलन; पारिस्थितिकी आणि पर्यावरणावर मानवाचा प्रभावः वैश्विक आणि प्रादेशिक पारिस्थितिकीतील बदल आणि असंतुलनः परिसंस्था त्याचे व्यवस्थापन आणि संवर्धन; पर्यावरणीय न्हास, व्यवस्थापन आणि संवर्धन; जैव विविधता आणि शाश्वत विकास, पर्यावरणीय धोरण, पर्यावरणीय धोके आणि सुधारात्मक उपाययोजना; पर्यावरणीय शिक्षण आणि कायदे.
मानवी भूगोल
- मानवी भूगोलातीत परिप्रेक्ष्यः क्षेत्रीय विभिन्नताः प्रादेशिक संश्लेषण; द्विभाजन आणि व्दैतवाद, पर्यावरणवाद; सांख्यिकी क्रांती आणि स्थानीय विश्लेषण; मूलगामी, वर्तनाधिष्ठित मानवी आणि कल्याणकारी दृष्टीकोन; भाषा, धर्म आणि धर्मनिरपेक्षताः जागतिक सांस्कृतिक प्रदेश, मानव विकास निर्देशांक.
- आर्थिक भूगोल: जागतिक आर्थिक विकास मापन आणि समस्या; जागतिक साधनसंपत्ती आणि तिचे वितरण; ऊर्जा संकट; वृद्धो मर्यादाः जागतिक कृषि, कृषि प्रदेशांचे प्रकारनिष्ठ वर्गीकरण, कृषि निविष्ठा आणि उत्पादकता; अन्न व पोषण समस्या, अन्न सुरक्षा; दुष्काळः कारणे, परिणाम आणि उपाययोजना; जागतिक उद्योग; स्थानीय प्रारुप आणि समस्या; जागतिक व्यापाराचा आकृतिबंध.
- लोकसंख्या आणि वसाहत भूगोल: जागतिक लोकसंख्या वाढ आणि वितरण, लोकसंख्याशास्त्रीय वैशिष्ट्ये : स्थलांतराची कारणे आणि परिणामः अतिरिक्त न्यूनत्तम आणि पर्याप्त लोकसंख्या संकल्पना, लोकसंख्या सिद्धांत, जागतिक लोकसंख्येच्या समस्या आणि धोरणे; सामाजिक स्वास्थ्य आणि जीवनमानाची दर्जा; लोकसंख्या एक सामाजिक भांडवल, ग्रामीण वसाहतींचे प्रकार आणि आकृतिबंध; ग्रामीण वसाहतीमधील पर्यावरणीय समस्याः नागरी वसाहतींचा श्रेणीक्रमः नागरी भूरुपवर्णनः अग्रेसर शहरांची संकल्पना आणि श्रेणी आकार नियम; नगरांचे कार्यात्मक वर्गीकरण; नागरी प्रभाव क्षेत्र, ग्रामीण नागरी पट्टे, उपग्रह नगरे, नागरीकरणाच्या समस्या आणि उपाय योजना; शहरांचा शाश्वत विकास.
- प्रादेशिक नियोजन: प्रदेशाची संकल्पना, प्रदेशांचे प्रकार आणि प्रादेशिकीकरणाच्या पद्धती; वृद्धि केंद्रे आणि वर्धन केंद्रेः प्रादेशिक असमतोल; प्रादेशिक विकासाची व्यूहरचना; प्रादेशिक नियोजनामधील पर्यावरणीय समस्याः शाश्वत विकासासाठी नियोजन.
- मानवी भूगोलातील प्रतिमाने, सिद्धांत आणि कायदे: मानवी भूगोलातील संस्थात्मक विश्लेषण, माल्थस, मास्कं आणि लोकसंख्याशास्त्रीय संक्रमण प्रतिमाने; विस्टॅलर व लॉश यांचे केंद्रस्थान सिद्धांत; पेरॉक्स आणि बॉडविले यांचे सिध्दांत. वॉन थुनेनचे कृषि स्थान प्रतिमानः वेबरचे औद्योगिक स्थान प्रतिमान, ओस्टोव्हचे वृध्दी टप्यांचे प्रतिमान, मर्मभूमी (हार्टलॅन्ड) व परिधीभूमी (रिमलॅन्ड) सिद्धांत; आंतरराष्ट्रीय सीमा आणि सोमा प्रदेशासंबंधातील कायदे.
पेपर-दोन
भारताचा भूगोल
- प्राकृतिक रचनाः भारताचे शेजारील देशांशी स्थलीय संबंध; संरचना आणि उठाव (relief); जलनिस्सार प्रणाली आणि पाणलोट क्षेत्र; प्राकृतिक प्रदेश; भारतीय मान्सून यंत्रणा आणि पर्जन्यमानाचे स्वरूप; उष्णकटिबंधीय चक्रीवादळे आणि पश्चिम विक्षोभः पूर आणि अवर्षण; हवामान प्रदेश, नैसर्गिक वनस्पती; मृदाचे प्रकार आणि तिचे वितरण.
- साधन संपत्तीः जमीन, पृष्ठभाग आणि भूजल, ऊर्जा, खनिजे, जैविक आणि सागरी साधनसंपत्ति, वन व वन्यजीव साधन संपत्ती आणि त्यांचे संवर्धन, ऊर्जा संकटे.
- कृषिः पायाभूत सुविधा; जलसिंचन, बी-बियाणे, खते, बीज, संस्थात्मक घटक; जमीन धारणा, भू-पट्टेदारी आणि जमीन – सुधारणाः पीक पध्दतो, कृषि उत्पादकता, कृषि तीव्रता, पीक संयोजन, जमीन क्षमताः कृषि सामाजिक वनीकरण; हरित क्रांती आणि तिचे सामाजिक आर्थिक पर्यावरणीय परिणामः कोरडवाहू शेतीचे महत्व; पशुधन साधनसंपत्ती आणि श्वेत क्रांती; जलोय संवर्धन, रेशीम उत्पादन, कृषि आणि कुक्कुटपालन; कृषि प्रादेशिकीकरणः कृषि-हवामान क्षेत्रे; कृषि पारिस्थितिकीय प्रदेश.
- उद्योग: औद्योगिक क्रांती; कापूस, ताग, वस्रनिर्माण, लोह आणि पोलाद, अॅल्युमिनियम, खते, कागद, रसायने आणि औषधनिर्माण, स्वयंचलित (automobile), कुटीरोद्योग आणि कृषि-आधारित उद्योग यांचे स्थान निश्चितीचे घटक; सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांसह उद्योग गृहे आणि संकुले; औद्योगिक प्रादेशिकीकरणः नवीन औद्योगिक निगम धोरण; बहुराष्ट्रीय निगम आणि उदारीकरण; विशेष आर्थिक क्षेत्रे; पर्यावरण स्नेही पर्यटन.
- वाहतूक, दळणवळण आणि व्यापार: रस्ते, रेल्वे, जलमार्ग, हवाईमार्ग आणि नलिकामार्गाचे जाळे आणि प्रादेशिक विकासामधील त्यांची पूरक भूमिका राष्ट्रीय आणि परराष्ट्रीय व्यापाराबाबत बंदरांचे वाढते महत्व, व्यापारशेषः व्यापार धोरण; निर्यात प्रक्रिया क्षेत्रे, दळणवळण आणि माहिती तंत्रज्ञानामधील विकास आणि अर्थव्यवस्था आणि समाजावर होणारे त्याचे परिणामः भारतीय अंतराळ कार्यक्रम.
- सांस्कृतिक जडणघडण (setting): भारतीय समाजाचे ऐतिहासिक पैलू वांशिक, भाषिक आणि मानववंशीयः विभिन्नताः धार्मिक अल्पसंख्याक प्रमुख जमाती, जमातींची क्षेत्रे आणि त्यांच्या समस्या; सांस्कृतिक प्रदेश; लोकसंख्येची वाढ, वितरण आणि घनता; लोकसंख्याशास्त्रीय वैशिष्ट्येः लिंग गुणोत्तर, वय संरचना, साक्षरता दर, श्रमिक पथकः अवलंबता गुणोत्तर, आयुर्मान, स्थलांतर (आंतर प्रादेशिक, प्रदेशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय) आणि त्यासंबंधीत समस्या; लोकसंख्येच्या समस्या आणि धोरणे, आरोग्य निर्देशांक.
- वसाहतीः ग्रामीण वसाहतींचे प्रकार, आकृतिबंध आणि भूरूपवर्णनः नगर विकासः भारतीय शहरांचे भूरूपवर्णन; भारतीय शहरांचे कार्यात्मक वर्गीकरण; बृहन्महानगरी प्रदेश आणि महानगरी प्रदेश; नागरी प्रसरणः झोपडपट्टी आणि त्यासंबंधित समस्याः नगर नियोजनः नागरीकरणाच्या समस्या आणि उपाययोजना.
- प्रादेशिक विकास आणि नियोजन: भारतातील प्रादेशिक नियोजनाचा अनुभवः पंचवार्षिक योजना ; एकात्मिकृत ग्रामीण विकास कार्यक्रमः पंचायती राज आणि विकेंद्रित नियोजन; लाभक्षेत्र विकास; पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन, मागास क्षेत्र, वाळवंट, अवर्षणप्रवण, डोंगरी आदिवासी क्षेत्र विकासासाठी नियोजन; बहु-स्तरीय नियोजन; बेट भूप्रदेशांचे प्रादेशिक नियोजन आणि विकास.
- राजकीय पैलू: भारतीय संघराज्यवादाचा भौगोलिक आधार; राज्य पुनर्रचना; नवीन राज्यांचा उदय; प्रादेशिक जाणीव आणि आंतर-राज्यीय समस्या भारताच्या आंतरराष्ट्रीय सीमा आणि त्यासंबंधातील समस्या: सीमेपलीकडील दहशतवाद; जागतिक कारभारामधील भारताची भूमिका, दक्षिण आशिया आणि भारतीय महासागर भूराजनीती.
- समकालीन समस्या: पारिस्थितिकीय समस्याः पर्यावरणीय धोकेः भूस्खलन, भूकंप, त्सुनामी, पूर आणि दुष्काळ, महामारीः पर्यावरणीय प्रदुषणाशी संबंधित समस्या, जमीन वापराच्या पद्धतीतील बदल; पर्यावरणीय प्रभाव परिक्षणाचो आणि पर्यावरणीय व्यवस्थापनाची तत्वे; जनसंख्या विस्फोट आणि अन्न सुरक्षा; पर्यावरणीय न्हासः निर्वनीकरण, वाळवंटीकरण आणि मृदेची धूपः शेतजमीन विषयक समस्या आणि औद्योगिक अशांतताः आर्थिक विकासामधील प्रादेशिक विषमताः शाश्वत वृध्दी आणि विकासाची संकल्पना; पर्यावरणीय जागरुकता नद्यांची जोडणी; जागतिकीकरण आणि भारतीय अर्थव्यवस्था.
टीप: उमेदवारांनी या पेपरमध्ये समाविष्ट असलेल्या विषयांशी संबंधित नकाशावरील एका अनिवार्य प्रश्नाचे उत्तर देणे आवश्यक असेल.