लोकप्रतिनिधित्व कायदे
लोकशाही शासन संरचनेत मुक्त आणि पारदर्शक निवडणूक प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची असते. जेणेकरून लोकांनी निवडून दिलेलेच सरकार सत्तेत येईल. याच अनुषंगाने भारतीय लोकशाहीला सक्षम करण्यासाठी निवडणुकीच्या संदर्भात कायदे करण्याचे स्पष्ट अधिकार भारतीय संविधानाने प्रदान केले आहेत. जसे की भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 82 अंतर्गत संसदेस मतदारसंघ पुनर्रचनेचा अधिकार देण्यात आला आहे. ज्यानुसार प्रत्येक जनगणनेनंतर केंद्र सरकार मतदारसंघ…