भारतातील हत्तींची स्थिती (2025) — डीएनए-आधारित मोजणी

अहवाल नाव – Status of Elephants in India: DNA-based Synchronous All-India Population Estimation of Elephants’ (SAIEE 2021-25)

हत्ती प्रकल्प सुरुवात – 1992

अगोदरची मोजणी पद्धत – दुर्श्य व मलमूत्र आधारित मोजणी पद्धत

शेवटची आकडेवारी (2017) – 29,964

मागील मोजणीशी तुलना – जवळपास 8 वर्षांत 25% कमतरता; परंतु नवीन पद्धत जास्त वैज्ञानिक आणि अचूक असल्याने ही तुलना तार्किक ठरणार नाही.

प्रकाशक संस्था: भारतीय वन्यजीव संस्था, देहरादून (Wildlife Institute of India – WII)

वर्ष: 2025 (2021–2025 या कालावधीसाठीची मोजणी)

मुख्य तथ्ये:

➡️ भारतामधील हत्तींची एकूण संख्या: 22,466

➡️ वापरलेली पद्धत: डीएनए-आधारित mark–recapture method — ही पद्धत हत्तींसाठी प्रथमच वापरण्यात आली (याचसारखी पद्धत वाघांच्या गणनेकरिता वापरली जाते).

डीएनए-आधारित mark–recapture पद्धत म्हणजे काय:
यामध्ये वन्य परिसरातून प्राण्यांच्या मलमूत्र, केस, त्वचा किंवा इतर जैविक पदार्थांमधून त्यांचे जनुक (genetic material) गोळा केले जाते. या नमुन्यांद्वारे प्रत्येक हत्तीची ओळख स्वतंत्रपणे निश्चित केली जाते. नंतर पहिल्यांदा आढळलेल्या आणि पुन्हा आढळलेल्या जनुकांच्या प्रमाणावरून हत्तींच्या एकूण लोकसंख्येचा अंदाज लावला जातो. ही पद्धत अत्यंत अचूक, वैज्ञानिक आणि अप्रवेशक (non-invasive) असल्याने वन्यजीवांच्या लोकसंख्येचे निरीक्षण करण्यासाठी सर्वोत्तम मानली जाते.

➡️ उद्देश: या पद्धतीद्वारे भारतातील हत्तींच्या लोकसंख्येचे नवे वैज्ञानिक baseline (मूलभूत संदर्भमान) तयार करणे. तसेच वैज्ञानिक पद्धतीच्या आधारे हत्तीची गणना करणे.

राज्यानुसार हत्तींचे वितरण:

राज्य हत्तीसंख्या
कर्नाटक6,013
आसाम4,159
तामिळनाडू3,136
केरळ2,785

➡️ एकत्रित (कर्नाटक + आसाम + तामिळनाडू): 13,308 (≈59.3%) — म्हणजेच भारतातील सुमारे 60% हत्ती या तीन राज्यांमध्ये आढळतात.

हत्तींचे भौगोलिक वितरण:

  1. पश्चिम घाट प्रदेश (कर्नाटक, तामिळनाडू, केरळ): 53.17%
  2. ईशान्येकडील टेकड्या व ब्रह्मपुत्र मैदान (7 ईशान्य राज्ये + उत्तर बंगाल): 22.22%
  3. शिवालिक टेकड्या व गंगीय मैदाने: 9.18%
  4. मध्य भारत व पूर्व घाट प्रदेश: 8.42%

ईशान्य भारतातील हत्तींची स्थिती:

ईशान्येकडील सात राज्ये व उत्तर पश्चिम बंगाल मिळून 6,559 हत्तींचा अधिवास नोंदवला गेला आहे. हा प्रदेश हत्तींच्या संवर्धनासाठी आणि पर्यावरणीय संतुलनासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.

महत्त्व / वैज्ञानिक उपयोगिता:

➡️ भारतातील हत्तींची पहिलीच डीएनए-आधारित समकालिक गणना करण्यात आली आहे.
➡️ या सर्वेक्षणामुळे हत्ती संवर्धनासाठी एक वैज्ञानिकदृष्ट्या विश्वासार्ह आणि अद्ययावत आधाररेषा (scientifically robust baseline) तयार झाली आहे.
➡️ या अहवालामुळे भविष्यातील संवर्धन धोरणे, अधिवास व्यवस्थापन आणि लोकसंख्या निरीक्षणासाठी ठोस मार्गदर्शन मिळेल.

“विशेषतः मध्य भारत आणि आसाममध्ये ‘वनांचे नुकसान, अधिवासाचे विखंडन आणि कॉरिडॉर कनेक्टिव्हिटी नष्ट होणे’ यामुळे संघर्ष वाढला आहे. आशावादी गोष्ट अशी आहे की शिकार कमी झाली आहे पण खरी चिंता अधिवासाचे नुकसान आहे.” – कमार कुरेशी (शास्त्रज्ञ, WII)

ही नवी डीएनए-आधारित गणना पद्धत भारतातील हत्ती संवर्धन क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरली आहे. ती केवळ आकडेवारी देत नाही, तर हत्तींच्या जैवविविधतेच्या संरक्षणासाठी वैज्ञानिक नियोजनाचे नवे मानक स्थापन करते.