छपाई और अक्षर योजन उद्योग का एक साधारण डमी पाठ है

छपाई और अक्षर योजन उद्योग का एक साधारण डमी पाठ है

December 2024
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  

राज्यसेवा पूर्व परीक्षा

STATE SERVICES PRELIMINARY EXAMINATION

-: परीक्षा योजना :-

पेपर क्रमांक गुण कालावधी मानक माध्यम पेपरचे स्वरुप
पेपर - I (अनिवार्य) 200 २ तास पदवी मराठी व इंग्रजी वस्तुनिष्ट/ बहुपर्यायी
पेपर - II (अर्हताकारी) 200 २ तास घटक क्रमांक (१) to (५) पदवी स्तर घटक क्रमांक (६) दहावी स्तर घटक क्रमांक (७) दहावी/बारावी स्तर

टीप – सामान्य अध्ययन पेपर क्रमांक २ (CSAT) हा अर्हताकारी (Qualifying) असून अर्हताप्राप्त करण्यासाठी किमान ३३% गुण मिळविणे आवश्यक राहील. या पेपरमध्ये किमान ३३% गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवारांची पेपर क्रमांक १ मधील गुणांच्या आधारे राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल.

नकारात्मक गुणदानः पेपर क्रमांक १ करीता व पेपर क्रमांक २ मधील “Decision making & Problem Solving” चे प्रश्न वगळून उर्वरित प्रश्नांकरिता नकारात्मक गुणदान लागू राहील.

१) प्रत्येक चुकीच्या उत्तराकरीता २५% किंवा १/४ एवढे गुण एकूण गुणांमधून वजा / कमी करण्यात येतील.

२) एखाद्या प्रश्नाची एकापेक्षा अधिक उत्तरे दिली असल्यास अथवा ज्या उमेदवाराने उत्तरपत्रिकेत पूर्ण वर्तुळ चिन्हांकित केले नसेल अशा प्रश्नाचे उत्तर चुकीचे समजण्यात येऊन त्या प्रश्नाच्या उत्तराकरीता २५% किंवा १/४ एवढे गुण एकूण गुणांमधून वजा/कमी करण्यात येतील.

३) वरीलप्रमाणे कार्यपध्दतीचा अवलंब करताना एकूण अंतिम गुणांची बेरीज अपूर्णांकात आली तरीही ती अपूर्णांकातच राहील व पुढील कार्यवाही त्याच्या आधारे करण्यात येईल.

४) एखाद्या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरितअसेल तर, अशा प्रकरणी नकारात्मक गुणांची पध्दत लागू असणार नाही.

अभ्यासक्रम

पेपर – एक (२०० गुण)

(१) राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या चालू घडामोडी.

(२) भारताचा इतिहास व भारतीय राष्ट्रीय चळवळ. महाराष्ट्राच्या भारांशासह.

(३) महाराष्ट्र, भारत व जगाचा भूगोल- महाराष्ट्राचा, भारताचा व जगाचा प्राकृतिक, सामाजिक, आर्थिक भूगोल.

(४) भारत आणि महाराष्ट्र राज्यशास्त्र व प्रशासन संविधान, राजकीय प्रणाली, पंचायती राज, नगर प्रशासन, सार्वजनिक धोरण, हक्क विषयक प्रश्न इत्यादी.

(५) आर्थिक व सामाजिक विकास-शाश्वत विकास, दारिद्रय, समावेशन, लोकशाही, सामाजिक क्षेत्रातील उपक्रम इत्यादी.

(६) पर्यावरण पारिस्थितीकी, जैव विविधता आणि हवामान बदल यांवरील सर्वसाधारण प्रश्न- याला विषय विशेषज्ञांची

गरज नाही.

(७) सामान्य विज्ञान

 

पेपर दोन (२०० गुण)

(१) आकलन

(२) संवाद कौशल्यांसह आंतर व्यक्तिगत कौशल्य.

(३) तर्कशुद्ध तर्क आणि विश्लेषणात्मक क्षमता

(४) निर्णय क्षमता आणि समस्या निराकरण.

(५) सर्वसाधारण मानसिक क्षमता

(६) मूळ संख्याता (अंक आणि त्यांचे संबंध, परिमानाचा क्रम इत्यादी) (इयत्ता दहावी स्तरावरील), विदा अनुयोजन (तक्ता, आलेख, कोष्टक, विदा पर्याप्तता इत्यादी- इयत्ता दहावी स्तरावरील)

(७) मराठी आणि इंग्रजी भाषा आकलन कौशल्य (इयत्ता दहावी / बारावी स्तरावरील)

 

टीप- १ : इयत्ता दहावी/ बारावी स्तरावरील मराठी आणि इंग्रजी भाषा आकलन कौशल्याची तपासणी (पेपर २ च्या अभयासक्रमातील शेवटचा भाग) प्रश्नपत्रिकेत उलट भाषांतर न देता, मराठी आणि इंग्रजी भाषेतील परिच्छेदामार्फत करण्यात येईल.

टीप- २ : प्रश्न बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रकारचे असतील.

टीप- ३ : मूल्यमापनाच्या प्रयोजनासाठी राज्यसेवा (पूर्व) परीक्षेच्या दोन्ही पेपरला उमेदवारांनी बसणे अनिवार्य आहे. राज्यसेवा (पूर्व) परीक्षेच्या दोन्ही पेपरला तो/ ती बसला नाही तर अशा उमेदवाराचा मूल्यमापनासाठी विचार करण्यात येणार नाही.

छपाई और अक्षर योजन उद्योग का एक साधारण डमी पाठ है

छपाई और अक्षर योजन उद्योग का एक साधारण डमी पाठ है

December 2024
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031