महिलांच्या सबलीकरणासाठी रोख हस्तांतरण योजना पुरेशा आहेत का?
भारतामध्ये गेल्या काही वर्षांत कल्याणकारी राजकारणाला “स्त्रीकेंद्रित” वळण मिळाले आहे. महिलांसाठी थेट रोख हस्तांतरण (Direct Benefit Transfer – DBT) योजना या केवळ सामाजिक सुरक्षा उपाय न राहता राजकीय आणि आर्थिक साधन म्हणूनही उदयास आल्या आहेत. ‘जन धन–आधार–मोबाइल (JAM)’ त्रिसूत्रीच्या आधारे या योजना महिलांना औपचारिक बँकिंग व्यवस्थेशी जोडतात. परंतु प्रश्न असा आहे की, महिलांच्या बँक खात्यात…